पुण्यातील CNG Pump उद्या राहणार बंद; PDAने दिली माहिती

CNG gas
CNG gasSakal

पुणे : पुण्यातील 60 हून अधिक CNG पंप उद्या (शनिवारी) बंद राहणार असल्याची माहिती आहे. पेट्रोल डीलर असोसिएशनने 1 ऑक्टोबर रोजी NO SALE बद्दल 7 दिवसांपूर्वी Torrent आणि OMC ला कळवले होते परंतु त्यावर त्यांना कोणतेही उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे उद्या पुण्यातीलसर्व CNG पंप एका दिवसासाठी बंद राहणार असल्याची माहिती आहे.

(Pune CNG Pump Latest Updates)

दरम्यान, नोव्हेंबर 2021 मध्ये जारी केलेल्या MOPNG परिपत्रकानुसार डीलर्सना त्यांच्या ट्रेड मार्जिनमधील पुनरावृत्तीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. डीलर्सकडून वंचित ठेवलेल्या टोरेंट गॅसकडून त्यांचा हक्क आणि वाजवी मार्जिन या मागणीसाठी पेट्रोल डीलर असोसिएशनने हा बंद पुकारला आहे. तर मागण्या मान्य केल्या नसल्याने 1 ऑक्टोबर रोजी पंपांवर टोरेंट सीएनजीची विक्री न करण्यावर विक्रेते ठाम आहेत.

CNG gas
Rain Updates : मान्सूनच्या निरोपाआधीच पावसाने झोडपले; ४ दिवस राहणार गडगडाट

कंपनीकडून व्याजासह विलंबित कमिशनची थकबाकी देण्याची व्यापाऱ्यांकडून मागणी करण्यात येत आहे. पुण्यात जवळपास 60 हून अधिक CNG पंप असून उद्या या बंदमुळे अनेक रिक्षा आणि कॅब चालकांना याचा फटका बसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com