

MNS Student Wing Protests at CoEP Tech
Sakal
पुणे : सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात असणारी अस्वच्छता, पाण्याचा तुटवडा आणि मूलभूत सुविधा नसल्याच्या तक्रारींवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) विद्यापीठात तीव्र आंदोलन केले. वसतिगृहातील खाणावळीत जेवणात झुरळ, माशा आणि स्टेपलरची पिन सापडल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या होत्या.