Pune Weather : पुण्यात थंडीचा कडाका वाढला, येलो अलर्ट जारी; पुढील तीन दिवस कसे असेल हवामान?
Pune Cold Wave Alert : राज्यात थंडीचा कडाका वाढला असून पुण्यात तापमान १४°C वरून १०°C पर्यंत घसरले आहे. पुणे शहर, शिवाजीनगर आणि विमाननगर येथे दोन वर्षांतली सर्वात कमी तापमान नोंदली गेली. ताम्हिणी, भोर घाट आणि खंडाळा परिसरात तापमान ८°C पर्यंत खाली आले आहे.
राज्यात थंडीचा कडाका वाढला असन पुण्यातही पारा चांगलाच घसरला आहे. थंडीच्या लाटे सदृश्य स्थिती असून हवामान विभागाने पुण्यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. मंगळवारी किमान तापमान १४ अंश सेल्सियस पर्यंत होते, तर आज ते थेट १० अंशांवर वर घसरले आहे.