esakal | शेतकऱ्यांसाठी कॉंग्रेस उतरणार रस्त्यावर; राज्यभरात उद्या ‘शेतकरी बचाव रॅली’!
sakal

बोलून बातमी शोधा

Congress

राज्यात संगमनेर (जिल्हा नगर), कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि कोकणात एक, अशा सहा ठिकाणांहून स्वतंत्र रॅली काढण्यात येणार आहेत.

शेतकऱ्यांसाठी कॉंग्रेस उतरणार रस्त्यावर; राज्यभरात उद्या ‘शेतकरी बचाव रॅली’!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : केंद्र सरकारने लोकशाही, संविधान आणि संसदेचे नियम पायदळी तुडवत तीन शेतकरी विरोधी कृषी विधेयके मंजूर केल्याच्या निषेधार्थ आणि या विधेयकांच्या अंमलबजावणीला तीव्र विरोध करण्यासाठी काॅग्रेसच्यावतीने उद्या (गुरुवारी ता.१५) राज्यभरात 'शेतकरी बचाव रॅली' काढण्यात येणार आहे. या रॅलीत दहा हजार गावांतील शेतकरी सहभागी होणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी (ता.१४) सांगितले.

राज्यातील सहा ठिकाणांहून एकाचवेळी काँग्रेसचे नेते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. हे तीनही नवे कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी काळे कायदे आहेत. या काळ्या कायद्याविरोधात राज्यभरात रस्त्यावर उतरून काँग्रेसच्यावतीने संघर्ष करण्यात येणार असल्याचेही थोरात यांनी यावेळी स्पष्ट केले.

पुणेकरांनो सावध राहा; डिसेंबर-जानेवारीत येणार कोरोनाची दुसरी लाट!​

थोरात म्हणाले, "केंद्रातील भाजप सरकार सातत्याने उद्योगपतींच्या हिताचे आणि शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे. आता कृषी आणि कामगार कायदे आणून नरेंद्र मोदी सरकार शेतकरी आणि कामगारांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करत आहे. या काळ्या कायद्यांमुळे देशातील शेतकरी, कामगार उद्ध्वस्त होणार असून त्यांना उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचा हा डाव आहे. या कायद्यांना विरोध करण्यासाठी यापूर्वी २६ सप्टेंबरला ऑनलाईन मोहीम राबविण्यात आली होती. शिवाय २८ सप्टेंबरला राज्यातील प्रमुख काँग्रेस नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांना निवेदन देऊन हे कायदे रद्द करण्याची मागणी केली होती. महात्मा गांधी जयंतीदिनी राज्यातील सर्व जिल्हा आणि तालुका मुख्यालयी धरणे आंदोलन आणि मोर्चे काढण्यात आले होते." राज्यात संगमनेर (जिल्हा नगर), कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि कोकणात एक, अशा सहा ठिकाणांहून स्वतंत्र रॅली काढण्यात येणार आहेत.

Positive Story : शेतकऱ्यांच्या हाकेला धावून आला जिल्हाधिकारी; धान्याला मिळवून दिला योग्य भाव!​

संगमनेरची रॅली काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, खासदार राजीव सातव यांच्या कोल्हापूर येथील रॅली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या,औरंगाबाद येथील रॅली वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या, अमरावती येथील रॅली महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या, नागपूरमधील रॅली ऊर्जा मंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनिल केदार, मदत, पुनवर्सनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या, तर कोकण विभागातील रॅली प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)