

Mundhwa Land Case
sakal
पुणे : मुंढवा आणि बोपोडीतील जमीन खरेदी प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या पुणे शहरचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या सर्व निर्णय व आदेशांची जिल्हा प्रशासनाकडून फेरतपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीत अनियमितता अथवा संशयास्पद बाबी आढळल्यास त्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.