पुणे : जिल्ह्यातील १२ ते १४ वयोगटातील बालकांना शाळेतच कोरोना लस द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vaccination in school

पुणे : जिल्ह्यातील १२ ते १४ वयोगटातील बालकांना शाळेतच कोरोना लस द्या

पुणे : पुणे शहर व जिल्ह्यातील १२ ते १४ या वयोगटातील बालकांचे लसीकरण आठ दिवसांच्या पूर्ण करण्यात यावे आणि यासाठी सर्व शाळांमध्ये बालकांच्या कोरोना लसीकरणाचे खास शिबिरे आयोजित करावीत आणि सरकारी व खासगी रुग्णालयातील सर्व आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि ६० वर्षांच्या पुढील सर्व ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस देण्यात यावा, असा आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी बुधवारी (ता.२३) दिला आहे.

शहरात मागील आठ दिवसांपासून तर, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात २१ मार्चपासून १२ ते १४ या वयोगटातील बालकांना कोरोना लस देण्यास सुरवात झाली आहे. मात्र या लसीकरणासाठी फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी आणि आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेतली. या बैठकीत बोलताना त्यांनी हा आदेश दिला आहे. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार हेही उपस्थित होते.

कोरोनाच्या बूस्टर डोसच्या पहिल्या टप्प्यात केवळ ६० वर्षे वयांपुढील ज्येष्ठ नागरिकांनाच बूस्टर डोस दिला जात होता. परंतु आता हा बूस्टर डोस ज्येष्ठ नागरिकांबरोबरच सर्व फ्रंटलाइन वर्कर्स आणि खासगी व सरकारी रुग्णालयातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना सरसकट दिला जाणार आहे. या लसीकरणासाठी पुरेसे डोस उपलब्ध असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आठ दिवसात बारा हजार बालकांचे लसीकरण

पुणे शहरात मागील आठ दिवसांपासून तर, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तीन दिवसांपासून १२ ते १४ वयोगटातील बालकांचे कोरोना लसीकरण सुरु करण्यात आले आहे. या कालावधीत आतापर्यंत शहर व जिल्ह्यातील केवळ ११ हजार ८१२ बालकांचा कोरोना लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. या लसीकरणाचे प्रमाण हे अवघे तीन टक्के इतके आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी हे लसीकरण त्वरित पूर्ण करण्याचा आदेश दिला आहे.

  • आतापर्यंत क्षेत्रनिहाय झालेले बालकांचे लसीकरण

  • क्षेत्र पात्र बालके लसीकरण झालेले लसीकरणाची टक्केवारी

  • पुणे शहर १ लाख ४ हजार ७७२ हजार १९३५ १.९ टक्के

  • पिंपरी चिंचवड ९७ हजार ९१२ ५७२ ०.६ टक्के

  • ग्रामीण जिल्हा १ लाख ४० हजार २४२ हजार ९३०५ ६.६ टक्के

  • एकूण पुणे जिल्हा ३ लाख ४२ हजार ७९६ ११ हजार ८१२ ३ टक्के

Web Title: Pune Collector Order Vaccinate Children District School Booster Dose Health Worker

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top