esakal | पुणे जिल्ह्यात लॉकडाउन? सोशल मीडियातील व्हायरल व्हिडिओवर जिल्हाधिकाऱ्यांच स्पष्टीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

Lockdown

नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले. 

पुणे जिल्ह्यात लॉकडाउन? सोशल मीडियातील व्हायरल व्हिडिओवर जिल्हाधिकाऱ्यांच स्पष्टीकरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : जिल्ह्यात पुन्हा लॉकडाउन होणार असल्याचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे शनिवारी (ता.२०) नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. परंतु ही केवळ अफवा असून, त्यावर कोणी विश्वास ठेवू नये, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले. शहर आणि जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. परिस्थिती आटोक्यात राहावी, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी शुक्रवारी (ता.१९) आदेश जारी केले आहेत.

पुणे पोलिस 'इन ऍक्‍शन'; गजा मारणेसह सराईत गुंड झाले फरार!

मंगल कार्यालये, हॉल, लॉन्स, कोचिंग क्लासेस, शाळा-महाविद्यालये, नाट्यगृह, चित्रपटगृहे, व्यायामशाळा, शॉपिंग मॉल्स, धार्मिक स्थळे, उद्याने अशा सार्वजनिक ठिकाणी निर्बंध कठोर करण्यात आले आहेत. मास्क न परिधान करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे. 

पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यास तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात येणार आहे. भाजी मंडई, दुकानदार अशा लोकांच्या ठराविक अंतराने नियमित कोरोना चाचण्या कराव्यात, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. 

'जागतिक स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी...'; शरद पवारांनी बारामतीकरांना दिला कानमंत्र​

दरम्यान, जिल्ह्यात लॉकडाउन होणार असल्याचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर शनिवारी व्हायरल झाला. परंतु ही अफवा आहे. त्यावर कोणी विश्वास ठेवू नये. अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत पोलिसांना आदेश देण्यात आले आहेत. मात्र, नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image