Sharad_Pawar
Sharad_Pawar

'जागतिक स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी...'; शरद पवारांनी बारामतीकरांना दिला कानमंत्र

माळेगाव (पुणे) : जागतिक स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी संशोधनात्मक ज्ञानाची आता नित्तांत गरज आहे. अर्थात संशोधनात्मक ज्ञान मिळण्यासाठी बारामतीसारख्या तालुक्याच्या ठिकाणी राष्ट्रीय अजैविक ताण संशोधन व्यवस्थापन संस्था, सायन्स सेंटर, सीओईपीची शाखा, केव्हीकेसारख्या उभ्या केल्या आहेत. त्यामुळे शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या प्रशासनाने फार्मसी काॅजेसह इतर शाखेतील विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण आणि प्रॅक्टिकली अनुभव मिळण्यासाठी वरील संस्थांशी करार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, निश्चितपणे तसे कार्य केल्यास विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या कुटुंबीयांची सर्वार्थाने प्रगती होईल, असे आवाहन शिवनगर संस्थेचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केले. 

माळेगाव सहकारी साखर कारखाना (ता.बारामती) संलग्न  शिवनगर विद्या प्रसारक मंडळाची सन २०१९-२० सालची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (ता.२०) संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अधिपत्याखाली पार पडली. त्यावेळी उपस्थिती सभासदांसह संस्था प्रशासनाला मागर्दशन करताना ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब तावरे, माजी उपाध्यक्ष रंजन तावरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, शिवनगर संस्थेतील डिग्री आणि डिप्लोमा उत्तीर्ण झालेल्या सुमारे तीनशे विद्यार्थींना गुणवत्तेच्या जोरावती कॅम्पसमधून विविध नामांकित कंपन्यांनी नोकरीसाठी संधी उपलब्ध करून दिली.

तोच धाग पकडत पवार म्हणाले, ''सध्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी गुणात्तम शिक्षणाची गरज आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने ज्या गाइडलाईन दिल्या आहेत, त्या स्वीकारल्याच पाहिजे. त्या पार्श्वभूमीवर शिवनगर संस्थेने चांगले कार्य़ केले आहे. त्यामुळे बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ८० टक्के मुलांना नोकरीची संधी उपलब्ध झाल्याची नोंद वाचायला मिळली, याचे मला मनापासून समाधान वाटते. कोरोनाची पार्श्वभूमी आणि प्रवेशाची रोडवलेली स्थिती विचारात घेता संस्थेमध्ये अर्थिक दृष्ट्या काटकस करून कारभार सांभाळणे खूप महत्वाचे आहे. मला खात्री आहे की बाळासाहेब तावरे आणि त्यांचे विश्वस्त मंडळ सर्वांना बरोबर घेऊन नक्की काम करेल.''

तत्पूर्वी सचिव प्रमोद शिंदे हे अहवाल वाचन करीत असताना संस्थेचा सुमारे ९ कोटींची तोटा असल्याचे पवार यांनी उपस्थितांच्या निदर्शास आणून दिला. त्यावर माळेगावचे संचालक योगेश जगताप यांनी तत्कालिन उपाध्यक्ष रंजन तावरे यांना चांगलेच धारेवर धरले. विद्यार्थ्यांचे दिवसेंदिवस प्रवेश कमी आणि आपल्या बगलबच्चांना मोठ्या संख्यने नोकरी देवून संस्थेचा तोटा केला असा आरोप केला. मदनराव देवकाते यांनी ही संस्था शेतकऱ्यांच्या मालकीची आहे, परंतु ठराविक गावातील मुलांना नोकरीमध्ये प्राधान्य दिले जात असल्याचे सांगितले. संचालक अनिल तावरे, नितीन सातव यांनी डिप्लोमा काॅलेजची प्रवेश संख्या सन २०१८-१९ पर्यंत ६६० इतकी होती. या विद्यार्थ्यांच्या हिशोबाने शिक्षक,  शिक्षेकत्तर व इतर व्यवस्था उभी केलेली आहे. परंतु विद्यार्थ्यांच्या अभावी २०१९-२० सालापासून ती प्रवेश संख्या २८५ इतकी खाली आली. त्यामुळे संस्थेच्या गरजेनुसार रोजंदारीमधील नोकरदारांना सेवाज्येष्ठतेप्रमाणे बोलावून त्यांनाच मस्टरवर घ्यावे, असे मत त्यांनी नोंदविले.

त्यावर रंजन तावरे तावरे म्हणाले, ''रोजंदारीवर लोक मस्टरवर आल्यास तो पगाराचा खर्च प्रवेश फिमध्ये सामाविष्ठ होईल, त्याचा आर्थिक भार संस्थेवर पडणार नाही. खरेतर याबाबतची माहिती मागच्या वार्षिक सभेत पवारसाहेबांच्या निदर्शनास आणून दिले होती. तसा प्रस्तावही तयार केला गेला, परंतु नंतरच्या विश्वस्त मंडळाने त्यावर कार्य़वाही केली नाही. तत्कालीन विश्वस्त मंळाने शासनाने दिलेल्या गाइडलाइनच्या आधारेच शिक्षकांची नोकरभरती केली आहे आणि त्याची कल्पना पवारसाहेबांना दिली होती.''  या वादावर पडदा टाकताना पवार म्हणाले, ''पहिले बोर्ड आणि आत्ताचे बोर्ड बदलले असले तरी मी कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून या संस्थेवर काम करीत आहे. त्यामुळे झालेले संस्थेचे कामकाज हे मला विचारूनच झालेले आहे. शेवटी शासनाच्या गाइडलाइननुसार काही निर्णय गतवर्षी घेतले आणि त्याचा निकालावरही चांगला परिणाम झाला आहे. 

अजित दादांचे आश्वासन...!
राज्यशासनाकडे विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपचे पैसे सुमारे साडेचार कोटी रुपये थकीत आहेत, ती रक्कम मिळाल्यास काहीअंशी संस्थेची तूट भरून येण्यास मदत होईल, असे मत उपाध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी नमूद केले. त्यावर अध्यक्ष पवार म्हणाले, राज्याचे वित्तमंत्री अजित पवार येथे बसलेले आहेत, त्यांनी याकामी मदत करावी. अर्थात त्याच तत्परतेने अजित पवार यांनी सदरची रक्कम तातडीने देण्याची व्यवस्था शासनस्तरावर केली जाईल, असे सांगितले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com