
पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पोलिसांकडून 'कोम्बिंग ऑपरेशन'
पुणे: शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी मध्यरात्री गुन्हेगारांच्या तपासासाठी कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. त्यामध्ये त्यामध्ये पोलिसांनी तब्बल शहरातील तब्बल 2 हजार 924 सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आले. त्यामध्ये 614 जणा त्यांच्या वास्तव्याच्या मुळ पत्त्यावर आढळून आले. बेकायदा स्त्र बाळगणाऱ्या 11 जणांना अटक करण्यात आली. तसचे पोलिसांनी या कारवाईमध्ये धारदार शस्त्रे, गावठी दारू, अंमली पदार्थ असा मुद्देमाल जप्त केला.
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सराईत गुन्हेगारांच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांकडून सोमवारी शहरात हि मोहिम राबविण्यात आली होती. बेकायदा बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी 11 जणांना अटक केली, त्यांच्याकडून 15 कोयते व दोन तलवारी पोलिसांनी जप्त केल्या. पोलिसांनी या कारवाईमध्ये शहराच्या वेगवेगळ्या भागातील लॉज, हॉटेल्सची तपासणी केली. पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने लोणी काळभोर परीसरात कारवाई करुन एकास अटक केली, तसेच चार किलो गांजा जप्त केला. तर गावठी दारू विक्री करणाऱ्या तिघांना अटक करुन पोलिसांनी त्यांच्याकडून 30 लीटर गावठी दारु जप्त करण्यात आली. याबरोबरच पोलिसांना कारवाईमध्ये आढळलेल्या 41 सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सहआयुक्त डॉ.रविंद्र शिसवे, अतिरिक्त पोलिस आयुुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, राजेंद्र डहाळे, नामदेव चव्हाण, पोलिस उपायुक्त डॉ.प्रियांका नारनवरे, सागर पाटील, नम्रता पाटील, रोहिदास पवार, राहुल श्रीरामे यांच्या संपुर्ण शहरात हि मोहिम राबविण्यात आली.