

Harshvardhan Sapkal on Sonia Gandhi
Sakal
पुणे : ‘आपला देश एकसंध कधीही नव्हता, परंतु गावगाड्याच्या स्वरूपात चालत होता. इंग्रजांनी हा देश ताब्यात घेतला व सोडताना देशाच्या एकसंधतेवर प्रश्न निर्माण केले. मात्र, महात्मा गांधी यांनी भारत नावाचे स्पंदन निर्माण करून ‘राष्ट्र’ नावाची संकल्पना सर्वांच्या मनात रुजवली व त्याद्वारे आपले वैश्विक अस्तित्व काँग्रेसने केले. आपला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आपण समजून घेतला पाहिजे,’ असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.