Pune : खेडमध्ये कॉंग्रेसला खिंडार! पंचायत समितीच्या माजी उपसभापतींनी बांधलं शिवबंधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमोल पवार

Pune : खेडमध्ये कॉंग्रेसला खिंडार! पंचायत समितीच्या माजी उपसभापतींनी बांधलं शिवबंधन

आंबेठाण : खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि मावळत्या पंचायत समितीमधील काँग्रेसचे एकमेव पंचायत समिती सदस्य अमोल पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशाने खेड काँग्रेसला मोठा झटका बसला असून शिवसेनेत मात्र उत्साह संचारला आहे.अमोल पवार हे आजवर खेड तालुक्यात माजी आमदार स्व. नारायणराव पवार यांच्या विचारसरणीने काम करीत होते.२०२४ साली खेड विधानसभेवर भगवा फडकावणार असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.

मुंबई येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पवार यांनी शिवबंधन बांधले.याप्रसंगी खासदार अरविंद सावंत,सुभाष देसाई,अंबादास दानवे,रविंद्र मिर्लेकर आदी उपस्थित होते.अमोल पवार यांच्या रूपाने एक तगडा गडी पक्षाला मिळाला असल्याचे उध्दव ठाकरे यांनी सांगितले.

यावेळी अमोल पवार यांच्या समवेत खरेदी विक्री संघाचे संचालक चेतनराव बोत्रे,भाजपा युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष राहुल येवले,कुरकुंडीचे माजी सरपंच सचिन भोकसे,माजी सरपंच अर्जुन गोगावले,सयाजी कोळेकर, खेड तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संतोष भसे,विनोद येवले,अभय बळवंतराव डांगले,रोहिदास मुंगसे,गणेश भसे,संदीप चव्हाण आदींनी यावेळी प्रवेश केला असून अन्य पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.

या पक्ष प्रवेश प्रसंगी खेड तालुक्यातून तालुकाध्यक्ष रामदास धनवटे, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, अशोक खांडेभराड, शिवाजी वर्पे,राहुल गोरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.