C&D Waste Crisis: Only One Processing Plant in Pune

C&D Waste Crisis: Only One Processing Plant in Pune

Sakal

Pune Development : पुण्यातील राडारोडा समस्येवर उपाय; चारही दिशांना प्रक्रिया प्रकल्पांची गरज

C&D Waste Crisis: Only One Processing Plant in Pune : पुण्यात विकासकामांची गती वाढली असताना, बांधकाम आणि पुनर्विकास प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या राडारोड्यावर (C&D Waste) प्रक्रिया करण्यासाठी शहरात वाघोली येथे एकमेव प्रकल्प असल्याने, वाहतुकीचा खर्च टाळण्यासाठी हा राडारोडा सर्रासपणे सार्वजनिक, नैसर्गिक ठिकाणी टाकून शहर विद्रूप केले जात आहे आणि पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे.
Published on

पांडुरंग सरोदे

पुणे : पुण्यात विकासकामांची गती वाढत असताना, त्या बदल्याची किंमत मात्र शहराच्या रस्त्यांना आणि पर्यावरणाला चुकवावी लागत आहे. शेकडो बांधकाम व पुनर्विकास प्रकल्पांमधून तयार होणारा राडारोडा टाकण्यासाठी महापालिकेकडे केवळ एकच ‘बांधकाम व राडारोडा प्रक्रिया प्रकल्प’ (सी ॲण्ड डी प्रोजेक्‍ट) असणे हीच सर्वांत मोठी अडचण ठरत आहे. परिणामी, हा राडारोडा सर्रासपणे सार्वजनिक ठिकाणी ढिगाऱ्यांच्या रूपात दिसू लागला आहे. त्यामुळे शहराच्या चारही दिशांना अशा प्रकल्पांची तातडीने गरज आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com