

Pune iPhone insurance claim rejection case
sakal
पुणे : हातातून पडून खराब झालेला आयफोन दुरुस्तीसाठी दिल्यानंतर अटीं-शर्तींचे कारण सांगून त्याचा विम्याचा दावा नाकारणे विमा कंपनीला महागात पडले आहे. मोबाइलच्या संरक्षणासाठी विमा घेतला, तो उद्देशच सफल होत नाही; तसेच विम्याचा दावा हा एकदाच मंजूर करण्यात येईल, ही अटही विम्यात नाही, अशी निरीक्षणे नोंदवीत ग्राहकाला नवीन आयफोन किंवा त्याचे ८९ हजार रुपये वार्षिक चार टक्के व्याजासहित परत करण्याचे आदेश आयोगाने विमा कंपनीला दिला आहे.