Pune : ग्राहकांनो, फसवणूक झाल्यास तक्रार करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Consumers are frustrated

Pune : ग्राहकांनो, फसवणूक झाल्यास तक्रार करा

पुणे : पेट्रोलपंपावर वाहनात इंधन भरताना मापात कमी मिळाले, वस्तूवरील मूळ छापील किमतीत खाडाखोड झाली आहे, छापील किंमतीपेक्षा जादा दराने विक्री सुरू आहे. तर, गॅस सिलिंडर वितरित करणाऱ्या वितरक प्रतिनिधीकडे वजन काटाच नाही, अशा पद्धतीचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास ग्राहकांनी तक्रार करावी, असे आवाहन वैध मापन शास्त्र विभागातर्फे करण्यात आले आहे.

सण-उत्सवात ग्राहकांची फसवणूक होऊ नये, यासाठी वैध मापन शास्त्र विभागातर्फे विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. उपनियंत्रक वैध मापन शास्त्र पुणे कार्यालयाच्या वतीने वेळोवेळी मुदतीत फेरपडताळणी केली जाते. पेट्रोल मापात कमी मिळत असल्याच्या तक्रारी येतात. वस्तूवरील मूळ छापील किमतीत खाडाखोड किंवा छापील किंमतीपेक्षा जादा दराने विक्री केली जाते. अशा स्वरुपाचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास संबंधित विक्रेत्याविरोधात वैध मापन शास्त्र विभागाकडून कारवाई केली जाते.

नियमांचे उल्लंघन आढळून आल्यास ग्राहकांनी वैध मापन शास्त्र यंत्रणेच्या नियंत्रक कक्ष संपर्क क्रमांक ०२२-२२६२२०२२, ०२०-२६१३७११४ तसेच ९८६९६९१६६६ या व्हॉटसअप क्रमांकावर किंवा dclmms_complaints@yahoo.in या ईमेल पत्त्यावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा वैध मापन शास्त्र उप नियंत्रक संजीव कवरे यांनी केले आहे.