कराच्या नावाखाली पुणे कँटोन्मेंट बोर्डात प्रवेश शुल्काची वसुली सुरूच

संरक्षण मंत्रालयाच्या पत्रात ‘वाहन प्रवेश शुल्क’ आकारणी बंद करण्याच्या सूचना कँटोन्मेंटना देण्यात आल्या आहेत.
Vehicle Entry Fees
Vehicle Entry Feessakal

कॅन्टोन्मेंट : संरक्षण मंत्रालयाच्या पत्रात ‘वाहन प्रवेश शुल्क’ (Vehicle Entry Fees) आकारणी बंद करण्याच्या सूचना कँटोन्मेंटना देण्यात आल्या आहेत. मात्र, पुणे कँटोन्मेंट बोर्ड (Pune Contonment Board) ‘वाहन प्रवेश करा’ची (व्हेइकल एन्ट्री टॅक्स) आकारणी करते, त्यामुळे हे पत्र पुणे कँटोन्मेंट बोर्डाला लागू नाही, असे तांत्रिक कारण बोर्डाने पुढे केले असून, ‘स्पष्ट निर्देश येत नाहीत, तोपर्यंत करवसुली सुरूच राहील,’ अशी भूमिका पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार यांनी घेतली आहे. (Pune Contonment Board Vehicle Entry Fees)

संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण मालमत्ता विभागाचे सहायक संचालक दमण सिंग यांनी लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाला आणि संरक्षण मालमत्ता विभागाच्या पुणे प्रधान संचालक कार्यालयाला पत्र पाठवून, कँटोन्मेंट हद्दीतून वाहन प्रवेश शुल्काची आकारणी बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कँटोन्मेंट बोर्डांकडून बॅरिकेड, नाके, संकलन केंद्रे उभारून वाहन प्रवेश शुल्क घेतले जाते.

Vehicle Entry Fees
ED मध्ये कमिशनर आहे, दारुच्या दुकानाचे लायसन्स काढून देतो; ५७ लाखांना गंडा

ही बाब केंद्र सरकारच्या मालाची ने-आण व वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या पुढाकाराशी आणि ‘इज ऑफ लिव्हिंग’ आणि ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’साठीच्या प्रयत्नांशी अनुसरून नाही. त्यामुळे कँटोन्मेट बोर्डांनी यापुढे वाहन प्रवेश शुल्काची आकारणी बंद करावी, असे या पत्रात नमूद आहे.

त्यानुसार, खडकी व देहूरोड कँटोन्मेंटने वाहन प्रवेश शुल्काची आकारणी बंद केली आहे. परंतु, पुणे कँटोन्मेंट बोर्डाने या पत्राकडे दुर्लक्ष केले आहे.

कँटोन्मेंट हद्दीतून प्रवास करणाऱ्या व्यावसायिक वाहनांकडून वाहन प्रवेश शुल्काची आकारणी बंद करण्याच्या स्पष्ट सूचना संरक्षण मंत्रालयाने देशभरातील सर्व कँटोन्मेंट बोर्डांना दिल्या असतानाही, त्याकडे काणाडोळा करत पुणे कँटोन्मेंट बोर्डाने लष्कर परिसरातील व्यावसायिक वाहनांकडून वाहन प्रवेश कराची वसुली रविवारी व सोमवारी दिवसभर सुरूच ठेवली.

Vehicle Entry Fees
किराणा घेण्यासाठी गेलेल्या बारा वर्षीय मुलीचा दुकानदाराकडून विनयभंग

या संदर्भात स्पष्ट आदेश येईपर्यंत लष्कर परिसरातून प्रवास करणाऱ्या व्यावसायिक वाहनांकडून कर घेतला जाईल, असा पवित्रा बोर्डाने घेतला. त्यामुळे पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या तेरा कर संकलन केंद्रांवर ठेकेदाराचे कर्मचारी दोन्ही दिवस करवसुली करतच होते.

अमित कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे कँटोन्मेंट बोर्ड

वाहन प्रवेश शुल्काबाबत संरक्षण मालमत्ता विभागाने व्यवसायिक वाहनांमधून प्रवेश शुल्क थांबविण्याच्या सूचना दिल्या आहे. वाहन प्रवेश शुल्क व वाहन प्रवेश कर यामध्ये फरक असून आम्हाला वारंवार अनेकांकडून वाहन प्रवेश कर बंद करण्यासाठी दबाव केला जातोय. सध्याचा निर्देश आम्हाला लागू होत नाही. बोर्डाला जो पर्यंत केंद्र सरकार कडून निर्देश येत नाही तो पर्यंत पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डात प्रवेश कर आकारणी सुरूच राहील.

व्यावसायिक वाहनांकडून घेतला जाणारा कर

वाहनांचा प्रकार कर (रुपयांत)

  • प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बस ७०

  • मालवाहतूक ट्रक १००

  • प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोटारी ५०

  • मालवाहतूक करणाऱ्या रिक्षा व रिक्षा-टेम्पो ५०

  • मालवाहतूक करणारे ट्रॅक्टर व ट्रक ३०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com