Pune News: दुरुस्तीच्या नावाखाली सात कोटींची फसवणूक; कंत्राटदाराला विश्रामबाग पोलिसांकडून अटक
Fraud Contractor Arrest: सांडपाणी वाहिनी दुरुस्तीच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाला सहा कोटी ७० लाखांची फसवणूक करणाऱ्या कंत्राटदाराला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. आरोपीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल; न्यायालयाने २८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
पुणे : सांडपाणी वाहिनी दुरुस्तीच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाला धमकावून पावणेसात कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या कंत्राटदाराला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने आरोपीला २८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.