
'कोरोनाच्या काळामध्ये स्मशानभूमीत पुणे महापालिकेची यंत्रणा कमी पडत असल्याने अनेक सामाजिक संस्थांना अंत्यविधीसाठी नियुक्त करण्यात आले होते.
पुणे : महापालिका पीएफआय स्मशानभूमी व्यवस्थापनाच्या कामावरून वाद
पुणे - देशभरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संघटनेच्या कार्यकर्त्यांना देशविघातक कृत्य केल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केल्यानंतर व पुण्यात झालेल्या घोषणाबाजीवरून संशय निर्माण झाल्यानंतर आता पुणे महापालिकेने पीएफआयला स्मशानभूमी व्यवस्थापनाच्या कामावरून वाद सुरू झाला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने तत्कालीन सत्ताधारी भाजपवर टीका केली आहे. तर भाजपने ही नियुक्ती प्रशासनाने केली होती, आमच्या पत्रानंतर संस्थेकडून काम काढून घेण्यात आले असे सांगितले आहे.
'कोरोनाच्या काळामध्ये स्मशानभूमीत पुणे महापालिकेची यंत्रणा कमी पडत असल्याने अनेक सामाजिक संस्थांना अंत्यविधीसाठी नियुक्त करण्यात आले होते. त्यावेळी ‘पीएफआय’ला ही काम देण्यात आले होते. आता यावरून राजकारण सुरू झाले आहे. ‘भाजप सत्तेत असताना ‘पीएफआय’ सोबत करार केला. भाजपच्या नेत्यांनी हा करार रद्द करायला लावला पण त्यांनी या संदर्भातील माहिती तपास यंत्रणांना गेल्या दोन वर्षात का दिली नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी केली आहे.
माजी महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, कोरोनामध्ये सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न असल्याने तेव्हा राज्य सरकार व महापालिका प्रशासनाने सर्व निर्णय घेतले. त्यामध्ये स्मशानभूमीत अंत्यविधीसाठीचे काम पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाला देण्याचा निर्णय परस्पर घेण्यात आला. पण हा प्रकार आमच्या लक्षात येताच २ जून २०२० रोजी या पीएफआयकडून काम घेण्याचे पत्र आयुक्तांना दिले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी या संस्थेसोबतचा करार रद्द केला. राष्ट्रवादीकडून या विषयात गलिच्छ राजकारण केले जात आहे.