esakal | Corona Update: पुणेकरांना सलग सातव्या दिवशी दिलासा!

बोलून बातमी शोधा

corona test 1234.jpg

पुणे मनपा हद्दीत आज सलग सातव्या दिवशी नव्या रुग्णसंख्येपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे.

Corona Update: पुणेकरांना सलग सातव्या दिवशी दिलासा!

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

पुणे मनपा हद्दीत आज सलग सातव्या दिवशी नव्या रुग्णसंख्येपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे. आज नवे रुग्ण ४ हजार ६३१ कोरोनामुक्त ४ हजार ७५९ नोंदवले गेले. शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ३ लाख ४४ हजार ३३० झाली आहे. पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ११७ इतकी झाली आहे. आज एकाच दिवसात २० हजार ३४८ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २० लाख ३४ हजार ०५१ इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या ४९ हजार २८९ रुग्णांपैकी १,३६९ रुग्ण गंभीर तर ६,६१९ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. महापालिका हद्दीत नव्याने ५५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ६ हजार ४९८ इतकी झाली आहे. पुण्यात आतापर्यंत 7 लाख 96 हजार 645 रुग्णांची नोंद झालीये.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होण्याचं नाव घेत नाहीये. राज्यात 60 हजारांपेक्षा अधिकच रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या 24 तासांत राज्यात 66 हजार 191 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 61 हजार 450 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 832 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत राज्यात एकूण 64 हजार 760 रुग्णांचा कोरोनामुळे जीव गेलाय. आतापर्यंत 35 लाख 30 हजार 060 रुग्णांना घरी सोडण्यात आलं असून 6 लाख 98 हजार 354 सक्रिय रुग्ण आहेत. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे.