esakal | पुण्यात कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सोसायट्यांना होणार १० हजारांचा दंड 
sakal

बोलून बातमी शोधा

Breakfast

सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये पाचपेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळल्यास ती सोसायटी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात येणार आहे.

पुण्यात कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सोसायट्यांना होणार १० हजारांचा दंड 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये पाचपेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळल्यास ती सोसायटी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात येणार आहे. तसेच, त्या सोसायटीकडून नियमांचे पालन न झाल्यास दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गृहनिर्माण सोसायट्यांवर कटाक्षाने लक्ष ठेवण्यात येणार आहे. गृहनिर्माण सोसायटीत पाचपेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यास सहायक आयुक्तांकडून ती सोसायटी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेन्मेंट झोन) म्हणून जाहीर करण्यात येणार आहे.

हेही वाचा - पुण्यात न्यायाधीशानेच घेतली 50 हजारांची लाच; जामीनावर झाली सुटका

या सोसायटीमध्ये तेथील रहिवाशांव्यतिरिक्त बाहेरील व्यक्तींना प्रवेश करण्यास प्रतिबंध राहील. याबाबत सोसायटीच्या प्रवेशद्वारावर फलक लावण्यात यावेत. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राशी संबंधित सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सोसायटीवर १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल. तसेच, वारंवार उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, सोसायटीमध्ये येणाऱ्या कामगारांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात यावी. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरण करून घ्यावे, असे महापालिकेने जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

loading image