esakal | पुण्यात न्यायाधीशानेच घेतली 50 हजारांची लाच; जामीनावर झाली सुटका
sakal

बोलून बातमी शोधा

justice

पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने न्यायदंडाधिकारी जतकर यांनी सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.

पुण्यात न्यायाधीशानेच घेतली 50 हजारांची लाच; जामीनावर झाली सुटका

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : निकाल बाजूने लावण्यासाठी एका महिलेच्या माध्यमातून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी न्यायालयात सुरू असलेल्या दाव्यांची माहिती संबंधित महिलेला देऊन प्रकरण सेटल करण्याबाबत सांगितल्याचे न्यायादंडाधिका-यांनी मान्य केले आहे. या प्रकरणातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अर्चना जतकर यांची जामीनावर सुटका झाली आहे. न्यायदंडाधिकारी जतकर या मध्यस्ती महिलेला त्यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या जमिनीच्या बाबतच्या दाव्यांची माहिती देत असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. लाच स्वीकारणारी महिला शुभावरी भालचंद्र (व २९, रा. मावळ), सुशांत बबन केंजळे (वय ३५, रा. रावेत) आणि बडतर्फ पोलिस निरीक्षक भानुदास ऊर्फ अनिल जाधव (रा. मुंबर्इ) यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तर अजय गोपीनाथन याचा पोलिस शोध घेत आहेत. पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने न्यायदंडाधिकारी जतकर यांनी सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.

हेही वाचा - पुण्यातील नवले पुलावर आत्महत्येचा प्रयत्न; सिंहगड रस्ता पोलिसांनी वाचवला महिलेचा जीव
जतकर यांनी तक्रारदारांकडून काही रक्कम स्वीकारली आहे काय? याबाबत चौकशी केली असता त्या उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. तसेच त्यांचा दुसरा नंबर असलेला मोबाईल कुठे आहे याबाबत देणारे स्पष्टीकरण न पटणारे आहे, असे सरकार पक्षातर्फे विलास घोगरे पाटील यांनी न्यायालयास सांगितेल. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी त्यांची जामीनावर सुटका करण्याचे आदेश दिले. २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर. तसेच पोलिसांना तपासात सहकार्य करण्याच्या अटीवर जामीन मंजूर करण्यात आला. जतकर यांच्यावतीने ॲड. आर. व्ही. भांबरे यांनी कामकाज पाहिले.

loading image
go to top