Pune News : कोरोना काळातील गुन्हे आणि राजकीय आंदोलनातील कार्यकर्त्यांवरील गुन्हे तीन महिन्यात मागे घेणार

सामाजिक, राजकीय आंदोलनात कार्यकर्त्यांवर दाखल झालेले राजकीय गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी कॉँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे आज केली.
Police Commissioner Ritesh Kumar
Police Commissioner Ritesh Kumarsakal

पुणे - सामाजिक, राजकीय आंदोलनात कार्यकर्त्यांवर दाखल झालेले राजकीय गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी कॉँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे आज केली. त्यास पोलिस पोलिस आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत आगामी तीन महिन्यात राजकीय गुन्हे मागे घेण्यात येतील, असे आश्वासन दिले.

काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने शनिवारी नवनियुक्त पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची भेट घेतली. यावेळी  प्रदेश कॉँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी राज्यमंत्री रमेश बागवे , संजय बालगुडे, विरेन्द्र किराड, माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर, अविनाश बागवे, रमेश अय्यर आदी उपस्थित होते.शहरातील विविध समस्यांवर चर्चा केली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याशी शहरातील विविध समस्यांवर चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले.

कोरोना कालावधीत नागरिकांवर दाखल केलेले गुन्हे व राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे राज्य शासनामार्फत शासन निर्णय ( जीआर ) प्रमाणे परिमंडळ उपयुक्तंमार्फत समिती गठीत करून त्वरित निर्णय घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. राज्य सरकारने या संदर्भात आदेश दिले असले तरी पुणे पोलिसांनी अद्याप सामाजिक, राजकीय गुन्हे मागे घेतलेले नाहीत असे शिष्टमंडळाने आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. पोलिस आयुक्तांनी त्याबाबत सकारात्मक विचार करू असे संगत पुढील तीन महिन्यात राजकीय, सामाजिक गुन्ह्यांची पडताळणी करून योग्य कारवाई करण्यात येईल असे  सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com