esakal | Pune Corona Update: दिलासादायक! 10 दिवसांत शहरातील रुग्णांची संख्या साडेआठ हजारांनी कमी

बोलून बातमी शोधा

Pune Corona Update: दिलासादायक! 10 दिवसांत शहरातील रुग्णांची संख्या साडेआठ हजारांनी कमी

Pune Corona Update: दिलासादायक! 10 दिवसांत शहरातील रुग्णांची संख्या साडेआठ हजारांनी कमी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पुणे : पुणे शहरातील एकूण सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. गेल्या दहा दिवसांच्या तुलनेत आजअखेरपर्यंत (ता.३०) सक्रीय रुग्णांची संख्या ८ हजार ६७६ ने कमी झाली आहे. सध्या शहरात ४३ हजार २४४ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.

शहरातील एकूण सक्रीय रुग्णांपैकी ९ हजार ५६३ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिवाय ३३ हजार ६८१ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. दहा दिवसांपूर्वी एकूण सक्रीय रुग्णांची संख्या ५१ हजार ९२० इतकी होती, असे जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या दैनंदिन आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा: पोटची मुलं गेली पण आजी खचली नाही; नातवांसाठी राबण्याची जिद्द वाखाणण्याजोगी

दरम्यान, पुणे जिल्ह्यात आज ९ हजार ७६० नवे रुग्ण आढळून आले आहेत. आजच्या एकूण रुग्णांत शहरातील ४ हजार ११९ रुग्ण आहेत. आज ९ हजार ८२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण कोरोनामुक्तांमध्ये शहरातील सर्वाधिक ५ हजार १३ रुग्ण आहेत. अन्य १५२ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिवसातील एकूण मृत्यूमध्ये शहरातील ६५ मृत्यू आहेत.

दिवसभरात आढळून आलेल्या नवीन रुग्णांत पिंपरी-चिंचवडमध्ये २ हजार ०६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात २ हजार ९९२, नगरपालिका हद्दीत ५४८ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ९५ नवे रुग्ण सापडले आहेत. आज पिंपरी चिंचवडमधील ४६, ग्रामीण भागातील ३७ आणि नगरपालिका व कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील प्रत्येकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.