पुणेकरांना मोठा दिलासा; आज कोरोना रुग्णसंख्या तीन अंकी

corona
coronaesakal
Summary

नव्या कोरोना रुग्णसंख्येत दिलासा मिळत असताना आज त्यात आणखी भर पडली. कोरोनाची दुसरी लाट आल्यापासून आज नोंदवली गेलेली रुग्णसंख्या सर्वात कमी आहे

पुणे- नव्या कोरोना रुग्णसंख्येत दिलासा मिळत असताना आज त्यात आणखी भर पडली. कोरोनाची दुसरी लाट आल्यापासून आज नोंदवली गेलेली रुग्णसंख्या सर्वात कमी आहे. पुणे शहरात आज नव्याने ६८४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या आता ४ लाख ५९ हजार ९८७ इतकी झाली आहे. शहरातील २ हजार ७९० कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ३३ हजार ७९८ झाली आहे. (pune corona update patients covid active cases murlidhar mohol)

पुणे शहरात आज एकाच दिवसात ७ हजार ८६२ नमुने घेण्यात आले आहेत. एकूण टेस्ट संख्या आता २३ लाख ७२ हजार ०३४ इतकी झाली आहे. शहरात उपचार घेणाऱ्या १८ हजार ४४० रुग्णांपैकी १,४०२ रुग्ण गंभीर तर ५,२८७ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. महापालिका हद्दीत नव्याने ४३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ७ हजार ७४९ इतकी झाली आहे.

पुणे महापालिकेस लसींचा पुरवठा न झाल्याने मंगळवार, दि. १८ मे, २०२१ रोजी पुणे मनपा हद्दीतील सर्व कोरोना लसीकरण केंद्रे बंद राहणार आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com