Pune Corona Update: शुक्रवारी तीन आकडी रुग्णसंख्या; शनिवारी लसीकरण बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात शुक्रवारी तीन आकडी रुग्णसंख्या; शनिवारी लसीकरण बंद

पुण्यात शुक्रवारी तीन आकडी रुग्णसंख्या; शनिवारी लसीकरण बंद

sakal_logo
By
विनायक होगाडे

पुणे : शहरात आज पुन्हा तीन आकडी रुग्ण सापडले आहेत, ही दिलाशाची बाब आहे. या नव्या रुग्णांसह पुण्यातील आजवरच्या एकूण रुग्णांची संख्या ही साडेचार लाखांच्या वर पोहोचली आहे. आज पुण्यातील अडीच हजार रुग्ण बरे झाले आहेत. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह पुण्यातील आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही ४,४२,६६९ वर पोहोचली आहे. पुण्यात आज ४१ रुग्णांचा मृत्यू झाला असून पुण्यात आजवरच्या एकूण मृतांची संख्या ही ७,९२८ वर पोहोचली आहे.

हेही वाचा: झटक्यात बरं करणाऱ्या औषधासाठी तोबा गर्दी; ICMR करणार चाचणी

पुणे शहरात आज नव्याने ९७३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ६४ हजार ०७६ इतकी झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या १३ हजार ४७९ रुग्णांपैकी १,३१५ रुग्ण गंभीर तर ४,२७९ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे शहरात आज एकाच दिवसात ११ हजार ६७६ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २४ लाख १६ हजार इतकी झाली आहे.शहरातील २ हजार ४९६ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ४२ हजार ६६९ झाली आहे.

हेही वाचा: पुण्यात शनिवारी लसीकरण मोहीम राहणार बंद

पुण्यात शनिवारी लसीकरण मोहीम राहणार बंद

महापालिकेला शासनाकडून लस उपलब्ध झालेली नसल्याने उद्या (शनिवारी) शहरातील लसीकरण मोहीम बंद राहणार आहे. शहरात सध्या ४५ वयाच्या पुढील नागरिकांच्या पहिल्या व दुसऱ्या डोसचे लसीकरण सुरू आहे. पालिकेला मंगळवारी (ता. १८) साडे सात हजार कोव्हीशील्ड व बुधवारी अडीच हजार कोव्हॅक्सीन लस उपलब्ध झाली. त्यानुसार बुधवारी व गुरुवारी शहरात लसीकरण झाले. मात्र, त्यानंतर लस उपलब्ध न झाल्याने आज (शुक्रवारी) सर्व लसीकरण केंद्र बंद होते. शासनाकडून आज देखील लस उपलब्ध झालेली नसल्याने सर्व केंद्र शनिवारी देखील बंद राहणार आहेत, जर शनिवारी लस उपलब्ध झाली तर रविवारचे लसीकरण होईल. अन्यथा रविवारीही केंद्र बंद असतील असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शहरात आत्तापर्यंत साडे नऊ लाख नागरिकांना पहिला व दुसरा डोस मिळाला असून, अनियमित लस पुरवठ्यामुळे ही मोहीम विस्कळित झाली आहे.

loading image
go to top