esakal | पुण्यात शनिवारी लसीकरण मोहीम राहणार बंद
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात शनिवारी लसीकरण मोहीम राहणार बंद

पुण्यात शनिवारी लसीकरण मोहीम राहणार बंद

sakal_logo
By
विनायक होगाडे

पुणे : महापालिकेला शासनाकडून लस उपलब्ध झालेली नसल्याने उद्या (शनिवारी) शहरातील लसीकरण मोहीम बंद राहणार आहे. शहरात सध्या ४५ वयाच्या पुढील नागरिकांच्या पहिल्या व दुसऱ्या डोसचे लसीकरण सुरू आहे. पालिकेला मंगळवारी (ता. १८) साडे सात हजार कोव्हीशील्ड व बुधवारी अडीच हजार कोव्हॅक्सीन लस उपलब्ध झाली. त्यानुसार बुधवारी व गुरुवारी शहरात लसीकरण झाले. मात्र, त्यानंतर लस उपलब्ध न झाल्याने आज (शुक्रवारी) सर्व लसीकरण केंद्र बंद होते. (Vaccination campaign will be closed in Pune on Saturday)

हेही वाचा: झटक्यात बरं करणाऱ्या औषधासाठी तोबा गर्दी; ICMR करणार चाचणी

शासनाकडून आज देखील लस उपलब्ध झालेली नसल्याने सर्व केंद्र शनिवारी देखील बंद राहणार आहेत, जर शनिवारी लस उपलब्ध झाली तर रविवारचे लसीकरण होईल. अन्यथा रविवारीही केंद्र बंद असतील असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शहरात आत्तापर्यंत साडे नऊ लाख नागरिकांना पहिला व दुसरा डोस मिळाला असून, अनियमित लस पुरवठ्यामुळे ही मोहीम विस्कळित झाली आहे.

हेही वाचा: अच्छा है! 'फायझर'च्या दुसऱ्या डोसला विलंब झाल्यास अधिक फायदा

पुणे शहरात आज नवे ९७३ रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह पुण्यातील आजवरच्या एकूण रुग्णांची संख्या ही ४,६४,०७६ वर पोहोचली आहे. आज पुण्यातील २,४९६ रुग्ण बरे झाले आहेत. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह पुण्यातील आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही ४,४२,६६९ वर पोहोचली आहे. पुण्यात आज ४१ रुग्णांचा मृत्यू झाला असून पुण्यात आजवरच्या एकूण मृतांची संख्या ही ७,९२८ वर पोहोचली आहे.

loading image
go to top