कोरोनाविरुद्ध गनिमी काव्याने लढले 'विशाल' नेतृत्व

Vishal-Tambe
Vishal-Tambe

प्रसंग बाका असला, तरी त्याला धीराने सामोरे जायला हवे. त्यासाठी स्वयंशिस्त महत्त्वाची आहे, हे नागरिकांवर पुनःपुन्हा बिंबवत नगरसेवक विशाल तांबे यांनी एका अर्थाने कोरोनाविरोधातील लढाई गनिमी काव्याने लढली. या काळात प्रभागातील रहिवाशांची कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी त्यांनी रात्रीचा दिवस केला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाउनच्या सुरुवातीच्या काळात नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण होते. त्या वेळी लोकांच्या मानसिकतेबरोबरच परिसरातील वातावरण निरोगी ठेवणे फार महत्त्वाचे होते. त्या वेळची ती गरज ओळखून तांबे हे ठिकठिकाणचे ज्येष्ठ नागरिक, महिला, युवावर्ग, भजनी मंडळ, सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था व संघटनांच्या प्रतिनिधींशी वेळोवेळी संवाद साधत होते. कोरोनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात महापालिकेच्या टेस्टिंग सेंटरमध्ये नागरिकांची खूप धावपळ होत होती. या धावपळीत अनेकदा गरजू, गरीब नागरिकांना टेस्टपासून वंचित राहावे लागत असे. अशा नागरिकांना तांबे यांनी खासगी रुग्णालयात टेस्ट करून घेण्यासाठी आर्थिक मदत दिली.

लॉकडाउनमध्ये व्यापारी, नागरिक, पोलिस, महावितरण, महापालिका यांच्यात समन्वय राखणे फार गरजेचे होते. हा समन्वय राखतानाच लॉकडाउनच्या नियमांची अंमलबजावणी काटेकोर होणेही गरजेचे होते. तांबे यांनी या सर्व यंत्रणांशी संपर्क साधून हा समन्वय राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यासाठी ते सातत्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहिले. धनकवडी येथील स्व. विलासराव तांबे दवाखान्याच्या माध्यमातून आरोग्य सेवा सुरळीत व शेवटच्या घटकापर्यंत कशी मिळेल, यासाठी डॉक्‍टर व आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांनी वेळोवेळी योग्य त्या सूचना केल्या.

महापालिका आयुक्त, महापौर व आरोग्यप्रमुख यांच्याशी या काळात रोज संपर्कात राहून नागरिकांना सर्व सोयीसुविधा घरापर्यंत कशा उपलब्ध होतील, यासाठी तांबे यांनी प्रयत्न केले. खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कायम संपर्कात राहून त्यांनी नागरिकांसाठी शासकीय मदत मिळवून दिली. ज्येष्ठ नागरिक तसेच दुर्धर आजारांनी ग्रस्त नागरिकांना महापालिकेच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ घरी बसून देतानाच घरपोच औषधे उपलब्ध करून दिली. प्रभागातील विविध शाळा, कोचिंग क्‍लास चालक व पालकांशी संवाद साधून नियमांचे पालन करून शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना ऑनलाइन कशी उपलब्ध होईल, यासाठी तांबे यांनी प्रयत्न केले.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून ‘सोशल मीडिया’द्वारे योग्य माहिती रोजच्या रोज अपडेट करण्यावरही तांबे यांनी भर दिला. आत्ताच्या काळातही ते व्यापारीवर्गाशी सातत्याने बोलत आहेत. दुकानात किंवा दुकानाच्या परिसरात नागरिकांची गर्दी होऊ नये, यासाठी दक्ष राहण्याचे आवाहन ते व्यापाऱ्यांना करीत आहेत.

आता लॉकडाउनमधून आपली सुटका झाली असली, तरी कोरोनाचा विळखा मात्र अजूनही कायम आहे, याचे भान नागरिकांनी ठेवायला हवे. त्यासाठी प्रत्येकाने आपापली काळजी घ्यायला हवी. स्वयंशिस्त पाळायला हवी.
- विशाल तांबे, नगरसेवक, पुणे महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com