Pune Corporation
Pune CorporationSakal

पुणे : विकासनिधी वर्ग केल्याने सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये रोष

प्रभाग क्रमांक ७ ब मधील विकासनिधी प्रभाग क्रमांक ३० ड मध्ये वर्ग केल्याने सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे.
Published on

शिवाजीनगर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) वाकडेवाडी (प्रभाग क्रमांक ७ ब) मधील विकासनिधी जनता वसाहत दत्तवाडी ( प्रभाग क्रमांक ३० ड) मध्ये वर्ग केल्याने गोखलेनगर,जनवाडी, कस्तुरबा वसाहत मधील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका राजश्री काळे यांच्या स्थानिक विकास निधीतून प्रभाग सात मध्ये विविध ठिकाणी पेव्हिंग ब्लाॕक बसवणे, पदपथ दुरुस्त करणे, डांबरीकरण करणे, गोपालकृष्ण मंडळ ते जनता वसाहत डांबरीकरण करणे,कस्तुरबा वसाहत येथे ड्रेनेज लाईन टाकणे या पाच कामांसाठी महापालिकेच्या वतीने पंचेचाळीस लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला होता.परंतू नगरसेविका काळे यांनी तो विकासनिधी दत्तवाडी येथे वर्ग केला आहे.प्रभागात अनेक समस्या असताना विकासनिधी वर्ग केल्यामुळे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये रोष निर्माण झाला.

Pune Corporation
होय! गाय आमच्यासाठी माता; पंतप्रधान मोदींनी विरोधकांना जोरदार सुनावलं

प्रभागात विकासकामे करत असताना कॉंग्रेस कडून मला विरोध झाला आहे.पोलिस संरक्षण घेऊन मला कामे करावी लागतात.कस्तुरबा वसाहत येथे काम करत असताना खोरे,टिकाव फेकले,बॅनर लावू दिले जात नाहीत, ठेकेदारांना धमकावले जाते. विकासकामे करत असताना विरोध केला जातो, कामे करू दिली जात नाहीत, तो निधी माघारी जाण्यापेक्षा दत्तवाडी झोपडपट्टी भागात विकासकामे करण्यासाठी वर्ग केला.मी तळागाळातील आहे,कामाची जाणीव आहे.

- नगरसेविका राजश्री काळे

आपल्या भागत निधी अभावी कामे होत नाहीत,ड्रेनेज, रस्ता डांबरीकरण, पदपथ अशी अनेक कामे प्रभागात करणं गरजेचं आहे.नगरसेविका प्रभाग सात च्या आहेत की इतर प्रभागातील आहेत.

- दत्तू धोत्रे रहिवासी गोखलेनगर.

Pune Corporation
पुणे : शासनाच्या परवानगीशिवाय बोगस बियाणे विकणारा जेरबंद

पुणे शहरात अनेक ठिकाणी विकासनिधी वर्ग होतो.मात्र महापालिका निवडणुकीत तोंडावर आली असताना प्रभाग सात मधील सर्वच इच्छुक उमेदवार, माजी नगरसेवक यांची विद्यमान नगरसेवकांच्या सर्व हालचालीवर नजर असल्यामुळे सदर विषय उघडकीस आला.या परिसरातील सर्व पक्षीय कार्यकर्ते एकत्र येऊन निधी वर्ग करण्यास विरोध करून चर्चा करु लागले आहेत.ऐवढेच नाही तर वर्गीकरण थांबण्यासाठी माजी स्थायी समिती अध्यक्ष निलेश निकम, शिवसेनेचे उमेश वाघ, कॉंग्रेसचे अस्लम मिरजकर, मनसेचे निलेश निकम, संजय मयेकर,दत्तू धोत्रे,चेतन शेंडे यांनी

महापालिका आयुक्तांना सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी निवेदन दिले.तोपर्यात शुक्रवार (ता.२३) रोजी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत निधी वर्ग करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com