Pune Corporation Election: रिपब्लिकन पक्षाला हव्यात २५ जागा

खासदार संजय राऊत सध्या वापरत असलेली शिवराळ भाषा चुकीची आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationSakal
Updated on

पुणे : राजकीय मतभेदातून आरोप-प्रत्यारोप करताना शिवराळ भाषा वापरणे योग्य नाही.त्यामुळे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत सध्या वापरत असलेली शिवराळ भाषा चुकीची आहे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. तसेच पुणे महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला किमान २५ जागा मिळाल्या पाहिजेत, असेही मत त्यांनी व्यक्त केले. (Pune Corporation Election Updates)

सत्तेत असलेल्या लोकांनी अधिक जबाबदारीने बोलण्याची गरज आहे. सत्तेत असताना उलट-सुलट बोलणे पूर्णत: चुकीचे आहे. टीका करताना किंवा कुणाविषयी बोलताना त्याचा बाप काढण्याची गरज काय ? असा प्रश्‍न आठवले यांनी केला.भाजपा-शिवसेनेतील वाद मिटण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘भाजपा-शिवसेनेची अनेक वर्षांची दोस्ती आता दुष्मनीत बदलली असून त्यातून मार्ग काढला पाहिजे. या विषयात मी उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहे. दोन्ही पक्षातील वाद मिटला पाहिजे यासाठी मी प्रयत्न करणार आहे. राजकारणात काहीही होऊ शकतं. त्यामुळे भाजपा-शिवसेना एकत्र येऊन दोन्ही पक्षांनी राज्याचा विकास साधला पाहिजे.’’

Pune Municipal Corporation
Pune University: ‘प्रोटोकॉल’ नुसारच परीक्षा द्या; अन्यथा कारवाईला सामोरे जा

भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या व शिवसेने नेते खासदार संजय राऊत यांच्यात सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. माजी खासदार सोमय्या यांच्याविषयी बोलताना खासदार राऊत अत्यंत चुकीची भाषा वापरत आहेत. टीका करताना त्यांनी योग्य भाषा वापरावी, असे आवाहन आठवले यांनी यावेळी केले.

पुणे महापालिकेची निवडणूक रिपब्लिकन पक्ष भाजपासोबत लढणार आहे. या निवडणुकीत आमच्या पक्षाला किमान २५ जागा मिळाव्यात अशी मागणी आठवले यांनी केली.आम्ही महापालिका एकत्र लढू आणि जिंकून येऊ असा विश्‍वास आठवले यांनी व्यक्त केला.उत्तरप्रदेशासह देशातील पाच राज्यात सध्या निवडणुका सुरू आहेत.या पाचही राज्यात भाजपाबरोबर आम्ही आहोत.या सर्व ठिकाणी भाजपा सत्तेत येऊ, असे आठवले यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Illegal Drug Trade: Notorious Criminal Arrested for Selling Banned Injections in Hadapsar
Recruitment Drive: Government Approves 5,012 Assistant Professor Posts in Maharashtra
FYJC Admissions 2026: Over 12.49 Lakh Students Register for 11th Standard
Police Commissioner Amitesh Kumar
Marathi News Esakal
www.esakal.com