
PMC
Sakal
पुणे : मिळकतकर भरण्यासाठी नागरिकांकडून धनादेश देण्याला प्राधान्य दिले जाते. मात्र, नागरिकांनी दिलेले धनादेश न वटण्याच्या (चेक बाऊन्स) घटनांमध्ये वाढ झाल्याने मिळकतकर भरण्यात विलंब होत आहे. आता महापालिकेने संबंधित नागरिकांना थेट नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेकडून आतापर्यंत ४३१ जणांना या संदर्भात नोटीस दिल्या आहेत.