

'Operation Pinjra' launched with new cages to control the rising rat population in the city
Sakal
पुणे : शहरातील उंदरांच्या वाढत्या उपद्रवावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे महापालिकेने ‘ऑपरेशन पिंजरा’ राबवण्यास सुरुवात केली आहे. पावसाळ्याच्या काळात उंदरांचा त्रास वाढत असल्याने आरोग्य विभागाच्या कीटक नियंत्रण विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. यासाठी जवळपास एक लाख रुपयांचे नवीन पिंजरे खरेदी करण्यात आले आहेत. त्याद्वारे महिन्याला सरासरी ३०० उंदीर पकडण्यात येतात. तसेच, उंदीर मारण्यासाठी गाडीखाना दवाखान्यातून मोफत गोळ्यांचेही वाटप करण्यात येते.