

Growing Pollution Sparks Demand to Move Cement Plants Beyond Pune City
sakal
पुणे: रेडिमिक्स प्लांटमुळे (आरएमसी) होणाऱ्या प्रदूषणाने नागरिक त्रस्त झालेले असताना आता पुणे महापालिकेतील नगरसेवकांनीही याविरोधात आवाज उठवला आहे. बावधन, सिंहगड रस्ता, वडगाव बुद्रुक परिसरातील अनधिकृत आरएमसी प्लांट शहराबाहेर हलवा. रहिवासी भागातील अवैध प्रकल्प बंद करा, असा ठराव नगरसेवकांनी स्थायी समितीला दिला आहे. त्यावर आता प्रशासनाचा अभिप्राय मागवला असून, प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, या समस्येवर ‘सकाळ’ने आवाज उठवला होता.