Pune Court Convicts Seven Bangladeshi Women for Illegal Stay
पुणे : बेकायदा वास्तव्य करून देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या सात बांगलादेशी महिलांना पारपत्र कायदा आणि परदेशी नागरिक कायद्यांतर्गत दोषी ठरवून न्यायालयाने दोन वर्षे दोन महिन्यांची सक्तमजुरी व प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच त्यांना बांगलादेशात पाठवण्याचा आदेश सरकारला दिला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू. पी. कुलकर्णी यांनी निकाल दिला. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने नऊ ऑक्टोबर २०२३ ला बुधवार पेठेतील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर छापा टाकून सात बांगलादेशी महिलांना अटक केली होती. त्यांच्यावर फरासखाना पोलिस ठाण्यात पारपत्र कायदा आणि परदेशी नागरिक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र सादर करण्यात आले होते.