दाभोलकर हत्या : आरोपी विक्रम भावेच्या जामिनावर आज निकाल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

भावे याच्या जामिनावर गुरुवारी (ता. 16) निकाल लागणार होता. मात्र, न्यायाधीशांनी निकालासाठी पुढील तारीख दिली. आई आजारी असल्याने तारखेला हजर राहता येणार नाही,

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी विक्रम भावे याच्या जामीन अर्जावर आज निकाल होणार आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात प्रकरणाची सुनावणी सुरू असून, जामिनावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भावे याच्या जामिनावर गुरुवारी (ता. 16) निकाल लागणार होता. मात्र, न्यायाधीशांनी निकालासाठी पुढील तारीख दिली. आई आजारी असल्याने तारखेला हजर राहता येणार नाही,असा अर्ज आरोपी ऍड. संजीव पुनाळेकर यांच्या वतीने ऍड. समीर पटवर्धन यांनी केला होता. न्यायालयाने तो मंजूर केला. 

तर आरोपी शरद कळसकर याला किडनी स्टोनचा त्रास होत आहे, त्यामुळे उपचारासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध असलेल्या दवाखान्यात उपचार करावेत, अशी विनंती बचाव पक्षाने न्यायालयात केली. त्यावर न्यायालयाने कळसकर याला आवश्‍यक वैद्यकीय सेवा पुरवावी, असे आदेश कारागृह प्रशासनाला दिले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune court decision to Vikram Bhave bail petition

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: