Pune News : वृद्ध सासूला सुनेचा सासूरवास; न्यायालयाने दिला दिलासा, मुलगा-सुनेला घर सोडण्याचे आदेश
80-Year-Old Faces Domestic Abuse : पुण्यातील एका ८० वर्षीय वृद्ध सासूला मुलगा आणि सुनेकडून होणाऱ्या घरगुती हिंसाचार, मानसिक छळ आणि उपाशी ठेवण्याच्या त्रासातून न्यायालयाने दिलासा दिला असून, मुलगा-सुनेला घर सोडून जाण्याचे आणि प्रत्येकी दोन लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत.
पुणे : वयाच्या ८०व्या वर्षीही सासूला सुनेचा सासूरवास भोगावा लागत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. घरातील कामांपासून ते उपासमारीपर्यंतचा त्रास सहन करत अखेर वृद्ध सासूने पोलिस आणि न्यायालयाची दारं ठोठावली.