
वाद सोडविण्यासाठी गेलेल्या अश्वजीत पवळ आणि सूरज शेडगे यांनाही मारहाण करण्यात आली आहे.
परीक्षेसाठी कोर्टानं मंजूर केला जामीन; कोंबड्या चोरल्याच्या गैरसमजातून केला होता जीवघेणा हल्ला
पुणे : कोंबड्या चोरून नेल्याच्या गैरसमजातून सत्तूर आणि कोणत्यातरी तीक्ष्ण हत्याराने डोक्यात आणि खांद्यावर मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी विद्यार्थ्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आरोपीची परीक्षा असल्याने तसेच या गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचे कोणताही पुरावा न सापडल्याने त्याला जामीन देण्याची मागणी बचाव पक्षाकडून करण्यात आली होती.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.पी. अदोने यांनी हा आदेश दिला. रजत हिरामण दगडे (वय २० रा. बावधन बुद्रूक) असे त्याचे नाव आहे. त्याने ॲड. ऋषीकेश सुभेदार यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. रजत याचे नातेवाईक गणेश ऊर्फ निमितीश दिलीप शेडगे (वय २५, रा. भूगाव, ता. मुळशी) याच्यावरही या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. विजय शिवाजी येनपुरे (वय ३९, रा. भूगाव, ता. मुळशी) यांनी या बाबत फिर्याद दिली आहे. ही घटना २९ डिसेंबर २०२० रोजी भूगाव येथे घडली होती.
- बारामतीत डझनभर पिस्तुले जप्त; पिस्तुलांचं MP कनेक्शन आलं उजेडात!
वाद सोडविण्यासाठी गेलेल्या अश्वजीत पवळ आणि सूरज शेडगे यांनाही मारहाण करण्यात आली आहे. शेडगे याच्या गोठ्यातून कोंबड्या चोरून नेल्याच्या गैरसमजातून ही मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात दगडे याने जामिनासाठी अर्ज केला होता. माझी परीक्षा आहे. तसेच वादात सहभाग असल्याचा कुठलाही पुरावा न सापडल्याने जमीन देण्याची मागणी बचाव पक्षातर्फे न्यायालयात करण्यात आली होती.
- Fact Check: खरंच अण्णा हजारेंचा भाजप प्रवेश झालाय? जाणून घ्या सत्य
आरोपी हा शिक्षण घेत आहे. त्यामुळे त्याला तुरुंगात ठेवले, तर शिक्षण आणि आयुष्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला असून दोषारोपपत्र दाखल करण्याची औपचारिकता बाकी आहे, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)
Web Title: Pune Court Granted Bail Accused Case Attampt Murder Exam
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..