

pune court decision
esakal
Pune Crime News: पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी आणि सासूला न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ‘दररोजच्या भांडणांना कंटाळून पती आत्महत्येसारखे पाऊल उचलू शकतो, याची जाणीव असतानाही आरोपी त्याच्याशी निष्ठूरपणे वागले, त्यांचे वर्तन योग्य नव्हते,’ असे नमूद करत अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. आय. पेरमपल्ली यांनी हा निकाल दिला.