पुण्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. एका ७३ वर्षीय वृद्धाने दवाखान्यातील रिसेप्शनिस्ट तरुणीशी अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे. ही घटना समोर येताच नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.