
कात्रज : भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत आंदेकर टोळीतील सदस्यांचा खुनाचा कट उधळण्यात आला आहे. गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पेट्रोलिंग करत असताना, आंबेगाव पठार येथील सुर्या चौकात दत्ता बाळू काळे (रा. गणेश पेठ, पुणे) हा संशयास्पदरीत्या वावरताना पोलिसांना आढळला.