
Pune Crime
Sakal
पुणे : शहरात दहशत पसरविणाऱ्या आंदेकर टोळीवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली आहे. या टोळीतील सराईत गुन्हेगारांवर खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, अपहरण, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.