Pune Crime : शेतीच्या वादातुन जेष्ठ महिलेला विजप्रवाह टाकुन जीवेमारण्याचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Pune Crime : शेतीच्या वादातुन जेष्ठ महिलेला विजप्रवाह टाकुन जीवेमारण्याचा प्रयत्न

ऩसरापूर : शेतीच्या जुन्या वादातुन शेतात वीजवाहक तारा टाकुन विजप्रवाहाव्दारे जेष्ठ महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न करणारया व्यक्तीस राजगड पोलिसांनी अटक केली असुन खुन करण्याचा प्रयत्न केल्या बद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत हिराबाई दत्तात्रय कापरे वय 58 रा.भांबवडे ता.भोर या जेष्ठ महिलेने फिर्याद दिली असुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या बद्दल विजय निवृत्ती सुर्वे वय 38 रा.भोंगवली ता.भोर यास राजगड पोलिसांनी अटक केली आहे या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहीती नुसार फिर्यादी हिराबाई कापरे यांच्या दिराकडुन विजय सुर्वे यांनी त्यांच्या शेतालगत दिड गुंठा खरेदी केली असुन या बाबत तेथील जागा व विहीर याबाबत हिराबाई कापरे व विजय सुर्वे यांच्या मध्ये वाद चालु असुन कोर्टात खटला चालु आहे.

या दरम्यान 18 नोव्हेंबर रोजी सुर्वे यांने शेतात येऊन हिराबाई यांना तुम्ही माझ्या विरोधात कोर्टात गेला आहेत तुम्ही जर मला विहीरीतील पाणी घेऊन दिले नाहीतर तुम्हाला सुध्दा पाणी घेऊ देणार नाही तुला जीवे मारुन टाकीन अशी धमकी दिली होती त्या नंतर ता.22 रोजी हिराबाई हिचे पती शेतात गेले असता सुर्वे याने हातात विजवाहक तारा घेऊन लाईटच्या खांबा जवळ काहीतरी करत असल्याचे त्यांना दिसले त्यांनी दुर्लक्ष केले होते.

त्या नंतर रोजी दुपारी चार वाजता हिराबाई या शेतातील ज्वारीला पाणी देण्यासाठी गेल्या असता त्यावेळी देखिल सुर्वे याने तुम्ही मला तुम्ही कोर्टात गेला आहात ना तुम्हाला याच शेतात समाधी देतो अशी धमकी दिली व त्याच्या दुसरया दिवशी ता.24 रोजी हिराबाई दुपारी साडेअकरा वाजता ज्वारी भिजवण्यासाठी भोंगवली रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात गेल्यावर शेताचे दोन चारे भिजवुन झाल्यावर चवथ्या सारयात पाणी सोडुन भिजवायला गेल्या असता.

त्यांना विजेचा जोरदार झटका बसला व त्या पडल्या विजेचा करंट कोठुन बसला हे पाहण्यासाठी गेल्या असता पाण्यात गंजलेली विज वाहक तार टाकलेली दिसली ती कोठुन आली हे पाहीले असता शेजारील शेतातील ऊसा मधुन ही तार लपवत जवळच्या वीजेच्या खांबावर अकडा टाकल्याचे दिसले हे काम सुर्वे यानीच केल्याची खात्री पटताच त्यांनी याबाबत किकवी पोलिस चौकीत जीवेमारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली.

या बाबत किकवीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन खामगळ व सहकारयांनी तातडीने सुर्वे यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिल्यावर त्यास अटक करण्यात आली आहे .या बाबत पुढील तपास पोलिस निरीक्षक सचीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन खामगळ व सहकारी करत आहेत.

टॅग्स :Pune Newspolicepunecrime