Pune Crime Branch Raids Ajit Pawar Advisor’s Office
sakal
Pune Crime Branch conducted a raid at Design Box office : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार यांचे राजकीय सल्लागार असलेल्या नरेश अरोरा यांच्या कार्यालयावर पुणे क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला आहे. डिझाईन बॉक्स असं या कंपनीचं नाव आहे. ही कंपनी अजित पवार यांच्यासाठी काम करत असल्याचं सांगण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे मनपा निवडणुकीसाठी प्रचाराच्या तोफा आज ५ वाजता थंडावल्या आहेत. त्यानंतर लगेच ही कारवाई करण्यात आल्याने पुण्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.