
पुणे : खून प्रकरणातील आरोपी असलेल्या सराईतांकडून गुन्हे शाखेने दोन पिस्तुले जप्त केले. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी लक्ष्मीपुत्र नागेश बडधाळ (वय २४, रा. हरीतारा सोसायटी, भीमनगर, कोंढवे धावडे) आणि राहुल राजू थोरात (रा. दत्तवाडी, म्हसोबा चौक, पदमगल्ली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गुन्हे शाखेचे युनिट तीनचे पथक शुक्रवारी गस्त घालत होते. आरोपी लक्ष्मीपुत्र याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिस कर्मचारी अमित बोडरे आणि महेंद्र तुपसौंदर यांना मिळाली.