
घोरपडी : बी.टी. कवडे रस्ता येथे सोमवारी (ता. ४) रात्री एका माथेफिरूने वाहनांची तोडफोड केली. काठी घेऊन रात्री साडेअकरा वाजता दहशत निर्माण करण्याच्या हेतूने हा माथेफिरू व्यक्ती फिरत होता. त्याने दोन ते तीन वाहनांचे नुकसान केले. त्यातील एका वाहनात बसलेले एक लहान बाळ व त्याची आई सुदैवाने सुखरूप बचावले.