Pune Crime : पुण्यात चार ठिकाणी हिसकावल्या सोनसाखळ्या; बिबवेवाडी, औंध, येरवडा, हडपसर भागात पादचारी महिलांमध्ये भीती
Chain Snatching Crime : पुण्यात अवघ्या दोन दिवसांत सोनसाखळी चोरट्यांनी उच्छाद मांडून चार महिलांचे सुमारे तीन लाख रुपयांचे दागिने हिसकावून नेले, महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
पुणे : शहरात सोनसाखळी चोरट्यांनी उच्छाद मांडला असून, बिबवेवाडी, औंध, येरवडा, हडपसर या भागांत पादचारी महिलांचे दागिने हिसकावल्याच्या घटना गेल्या दोन ते तीन दिवसांत घडल्या.