पत्नीला तोंडी तलाक देणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

माहेरहून ५० लाख रुपये न आणल्यामुळे पत्नीला तोंडी तलाक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Pune Crime : पत्नीला तोंडी तलाक देणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा

पुणे - माहेरहून ५० लाख रुपये न आणल्यामुळे पत्नीला तोंडी तलाक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत कोंढवा पोलिसांनी पतीसह नातेवाइकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी एका विवाहितेने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार चिंचवड परिसरात नोव्हेंबर २०२० ते ३० मे २०२१ या कालावधीत घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अबुजर शेख याचा दोन वर्षांपूर्वी एका तरुणीसोबत विवाह झाला होता. अबुजरने व्यवसाय सुरु करण्यासाठी पत्नीला माहेरहून ५० लाख रुपये आणण्याची मागणी केली होती. परंतु पैसे न दिल्यामुळे पतीसह नातेवाइकांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरु केला.

पतीने भांडणात रागाच्या भरात पत्नीला तीन वेळा तलाक म्हणत तुला कोठे जायचे तेथे जा सांगितले. त्यामुळे ती गर्भवती अवस्थेत वडिलांच्या घरी निघून आली. याबाबत पत्नीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी चौकशी करून गुन्हा दाखल केला आहे.