
सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणीला एकांतात मिठी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या भोंदू ज्योतिषाला पोलिसांनी अटक केली आहे. तरुणीला एकांतात बोलावून मंत्र देण्याच्या ऐवजी विनयभंग करण्याचा या भोंदूने केला. पुण्यातील धनकवडी भागातील घटनेने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.