
पुण्यात उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाणेरमध्ये स्पा सेंटरवर छापा टाकल्यानं धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांनी केलाय. बाणेर परिसरातील चार स्पा सेंटरवर पुणे पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईवेळी स्पा सेंटरमध्ये हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती समोर आलीय. पोलिसांनी या प्रकरणी बाप लेकासह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.