Pune : "यहा के भाई हम है, हमारे नाद को लगे तो...", म्हणत शिवसेना कार्यालयावर गोळीबार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Crime

Pune News: "यहा के भाई हम है, हमारे नाद को लगे तो...", म्हणत शिवसेना कार्यालयावर गोळीबार

पुणे - मागील काही दिवसांपासून पुण्यातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचं दिसून येत आहे. कालच पुण्यात टोळक्याने तलवार आणि चाकूच्या सहाय्याने दहशत निर्माण केली होती. तर काही दिवसांपूर्वी फुकट काजूकतलीसाठी गोळीबार करण्याचा प्रयत्न केला होता. त्यातच आज शिवसेना अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्षाच्या कार्यालयावर गोळीबार करण्यात आला आहे. (Pune Crime News in Marathi)

हेही वाचा: NIA Raids : एनआयएकडून केरळमध्ये पीएफआयच्या 56 ठिकाणी छापेमारी; शस्त्र चालविण्याचे...

पुण्यातील वानवडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत शिवसेना अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्षाच्या कार्यालयावर टोळक्याकडून गोळीबाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पूर्व वैमनस्यातून दहशत निर्माण करण्यासाठी स्वत:ला भाई म्हणविणाऱ्याने हातात पिस्तुल घेऊन हवेत गोळीबार केला.

हेही वाचा जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

हेही वाचा: Bharat Jodo: स्मृती इराणी होणार सामील? काँग्रेस पक्षाने पाठवले निमंत्रण

मुख्य रस्त्यावर येऊन हातात पिस्तुल घेऊन यातील एकाने ‘यहा के भाई लागे हम है, हमारे नाद को लगे, तो जान से हात धो बैठोगे," असे म्हणत पिस्तुलातून फायरिंग करुन दहशत निर्माण केली. अतिक शेख, सादिक शेख, हुसेन कादिरी अशी आरोपींची नावे

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीचा भाऊ इम्रान व सादीक शेख याचा भाऊ शब्बीर कादरी यांच्यात २७ डिसेंबरला भांडणे झाली होती. त्याचा राग मनात धरुन अतिक व इतर दुचाकीवरुन सय्यदनगर येथील गल्ली नं २२ मधील कार्यालयात आले़. कार्यालयात कोणी नसताना त्यावर लाथांनी मारुन मुख्य रस्त्यावर येऊन अतिक याने हातात पिस्तुल घेऊन ‘यहा के भाई लागे हम है, हमारे नाद को लगे तो जान से हात धो बैठोगे,’ असे बोलून पिस्तुलातून गोळीबार करुन दहशत निर्माण केली.

पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक संदिप जनशिवले तपास करीत आहेत

टॅग्स :Pune NewsPune Crime News