
Pune Crime News: पुणे शहरातील कोथरुडमध्ये एका युनिसेक्स सलून चालकाला भाजप महिला मोर्चाच्या उज्ज्वला गौड यांच्या कार्यकर्त्यांना बेदम चोप दिला. सलून चालकाने कामगार युवतीला धर्मांतरण करण्यासाठी जबरदस्तीने कलमा पढायला लावला तसेच कुठेही वाच्यता न करु नये म्हणून एक लाख रुपये देण्याचे आमिष दाखविण्यात आल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्याकडून करण्यात आला. मात्र पोलिस तपासात वेगळीच माहिती समोर आली आहे.