
पुणे : नारायण पेठेतील महापालिकेच्या वाहनतळामधील जुगार अड्ड्यावर गुरुवारी रात्री विश्रामबाग पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. याप्रकरणी ३२ जणांविरोधात जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, जुगार खेळताना आढळलेल्या एका सहाय्यक फौजदारास निलंबित करण्यात आले आहे.